खेड जिल्हा परिषद गटात आयपीएलच्या धर्तीवर अनोख्या क्रिकेट स्पर्धा संपन्न : खंडेराव झनकर, सुदाम भोसले यांच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

शिवसेना खेड जिल्हा परिषद गट आयोजित छत्रपती प्रीमिअर लीग 2022 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या बहारदार अनोख्या स्पर्धेची संकल्पना शिवसेना, राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर व सुदाम भोसले यांनी प्रत्यक्षात आणली. स्पर्धेचे आयोजन शिवसेना क्रिकेट समितीचे संतोष वाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. ह्या स्पर्धेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. खेड जिल्हा परिषद गटामध्ये प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर खेड गटातील क्रिकेटपटूंचा लिलाव करून संघ बनवण्यात आले होते. ह्या भागातील क्रिकेट संघांचा स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.

खेड जिल्हा परिषद गटात आदिवासी आणि सर्वसामान्य लोकांचा रहिवास आहे. म्हणून येथील होतकरू क्रिकेटपटूंच्या कौशल्याला वाव मिळावा म्हणून आयपीएल स्पर्धांप्रमाणे क्रिकेट सामन्याचे आयोजन केले. या स्पर्धेला भरघोस प्रतोसद आणि चांगले यश मिळाले. स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात चांगले क्रिकेटपटू घडतील असा विश्वास वाटतो.
- खंडेराव झनकर, शिवसेना, राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान

ह्या स्पर्धेसाठी ४१ हजारांचे प्रथम पारितोषिक शिवसेना, राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर यांच्यातर्फे देण्यात आले. ३१ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक शिवसेनेचे राजाभाऊ घोरपडे यांनी तर तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये आनंद बांबळे यांनी दिले. उपस्थित मान्यवरांनी विजेत्या क्रिकेट संघांना सन्मानपूर्वक पारितोषिक वितरण केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, माजी नगरसेवक चंद्रकांत खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, माजी उपसभापती विठ्ठल लंगडे, गटप्रमुख साहेबराव झनकर, युवासेना उपतालुका प्रमुख भाऊसाहेब वाजे, सुदाम भोसले, हेमंत झनकर, रामभाऊ परदेशी, कैलास गाढवे, बहिरू केवारे, निवृत्ती आगीवले, संदीप झनकर, पोपट लहामगे, शिवाजी गाढवे, धोंडीराम गुंजाळ, आयोजन समिती सदस्य, खेड गटातील सर्व शिवसैनिक आदींसह सर्व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

आयपीएल सारख्या ह्या स्पर्धेची आमच्या भागात आवश्यकता होती. आयपीएलच्या धर्तीवर सर्व क्रिकेट सामने झाल्यामुळे छोट्या मोठ्या आदिवासी वाड्यांमधील क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली.
- राजाभाऊ घोरपडे, शिवसेना

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!