
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
नाशिक तालुक्यातील वाडगांव शिवार ( दाबडदरा ) येथे ३० सप्टेंबरला वाळु निंबेकर यांची ५ वर्षाची कु. शिवन्या निंबेकर ही चिमुकली मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. ही बातमी कळताच व्यथित दुःखी कुटुंबियांची सामाजिक कार्यकर्ता तथा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांनी भेट घेतली. संबंधित कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन करून त्यांना दिलास दिला. यावेळी अर्जुन ससाणे, सागर पिंपळके, समाधान खोडे, चेतन पावडे, अर्जुन घागरे उपस्थित होते.लवकरात लवकर तेथे मळे वस्तीत सिंगल फेज लाईट बसविण्यात येईल असे आश्वासन तुकाराम वारघडे यांनी दिले. सिंगल फेज लाईट आल्यानंतर असे प्रकार घडणार नाही. यासाठी उप वनसंरक्षकांसोबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.