इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आयोजित NRM राईड दर महिन्याला असते. शनिवारीनाईट राईडचे आयोजन करण्यात आले होते. या राईटसाठी रूट नासिक ते वडाळी भोई येथून रिटर्न पुन्हा नाशिक असा 100 किमी राईड होती. या राईटसाठी मालेगाव, सटाणा येथील सायकलिस्ट सहभागी झाले. नाईट राईडमध्ये नासिक सायकलिस्ट महिलांनीही उस्फुर्त सहभाग घेतला.
उष्मा वाढल्याने नाईट राईडचे आयोजन करण्यात आले. नाईट राईडचा रायडर्स यांना अनुभव मिळावा यासाठी हा प्रयत्न असतो. सर्व सायकलिस्ट अगदी तयारीनिशी रिफ्लेक्टेड जॅकेट, मागचे व पुढचे लाईट सर्व नियमांचे पालन वेगळाच राईडचा आनंद घेतात. सायंकाळी पाच वाजता राईडची सुरुवात झाली. NRM ही स्पर्धा नसून फक्त निर्धारित वेळेत पूर्ण करायची असते. NRM राईडच्या फ्लॅग ऑफसाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, किशोर माने, डॉ. मनीषा रौंदळ, बागलाण सायकलिस्टचे अध्यक्ष डॉ। विशाल अहिरे व मालेगाव येथून राईडसाठी आलेले पुष्पक निकमयांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आला.
NRM राईड सर्व रायडर्स यांनी निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अध्यक्ष राजेंद्र वानखेडे व इतर मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. रायडर्स यांना रात्री गुल्फीचा स्वाद नाशिक सायकलिस्ट, NRM यांच्या वतीने देण्यात आल्या. NRM राईडसाठी टीम प्रमुख किशोर काळे, संजय पवार, संध्या देशमाने, रोहिणी भामरे, नलिनी कड, सचिन नरोटे, अनिल सुपे यांनी परिश्रम घेतले.