
इगतपुरीनामा न्यूज – नाशिप्र संचालित इगतपुरीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी महाविद्यालयापासून ते इगतपुरीतील विविध ठिकाणी ग्रंथदिंडी काढण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्यात आली. ग्रंथपाल सोनवणे, सहाय्यक कन्नोर, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. प्रतिभा हिरे यांनी कुसुमाग्रज सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषिक व साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. मराठी भाषा विश्व साहित्य संमेलन पुण्यात पार पडले. अखिल भारतीय साहित्य संमेलन याच महिन्यात दिल्लीत घेण्यात आले याविषयी प्राचार्य प्रतिभा हिरे यांनी माहिती दिली. मराठी भाषेचे संवर्धन व जतन केले पाहिजे तसेच मराठी संस्कृती टिकविण्याचे काम प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे असे सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रा.ललिता अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सूत्रसंचालन कु. हर्षदा गोसावी, प्रा.ज्योती सोनवणे तर आभार कु. योगिता भांगरे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी सहाय्य केले. ह्या कार्यक्रम कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले होते.