आरोग्यसेवक सुभाष वेल्हाळ यांच्या ३ गुणवंत मुलांचा गावकऱ्यांकडून नागरी सत्कार : प्रतिकुल परिस्थितीत मुलांना केले उच्चशिक्षित

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

मुकणे येथील आरोग्यसेवक सुभाष वेल्हाळ यांची एक मुलगी वकील तर एक मुलगा व एक मुलगी डॉक्टरकीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत यश संपादन केल्याने मुकणे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मुकणे येथील बहुतांश युवक हे शासनाच्या सर्वच विभागात कार्यरत आहेत. नाशिक तालुक्यातील धोंडेगाव येथे आरोग्यसेवक म्हणुन कार्यरत असलेले सुभाष वेल्हाळ यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांच्या तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलगी जयश्री सुभाष वेल्हाळ, मुलगा विकास सुभाष वेल्हाळ हे दोघे डॉक्टर झाले. तिसरी मुलगी रोहिणी सुभाष वेल्हाळ ही वकील झाली. या तिन्ही बहीण भावंडांचा त्यांच्या यशाबद्दल मुकणे ग्रामपंचायतीच्यावतीने नागरी सत्कार संपन्न झाला.

तीनही मुलांनी कुटुंबाचेच नव्हे तर मुकणे गावाचेही नाव मोठे केले ही बाब गौरवास्पद असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती गणपत पाटील राव हे होते. माजी सरपंच विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण विष्णु राव, उपसरपंच भास्कर राव, सुभाष वेल्हाळ, भाऊसाहेब वेल्हाळ, सोसायटी संचालक गणेश राव, मोहन बोराडे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती आवारी, डॉक्टर सुनील चोरडिया उपस्थित होते. यावेळी पोपट राव, ज्ञानेश्वर राव, ग्रामसेवक दीपक पगार, अंकुश राव, निवृत्ती आवारी, देवराम राव, समाधान राव, सुनील राव, गणेश आदींसह मुकणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!