कसारा जवळ रेल्वेमार्गांवरील खडी धसली : रेल्वे वाहतूक तासभर उशिरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – मध्ये रेल्वेच्या अप मार्गावर कसारा ते उंबरमाळी स्थानका दरम्यान  रेल्वे रूळाखालील खडी धसली आहे. यामुळे रेल्वे रुळांची उंची कमी जास्त झाली. म्हणून कसाराहून मुंबई सीएसटी मार्गाकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी, घोटी, लहावीत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. हा खड्डा भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यामुळे अप मार्गाची वाहतूक एक तास उशिराने सुरू असून लोकल धिम्यागतीने सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

error: Content is protected !!