पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे गरजू महिलेला स्वयंपूर्ण होण्यासाठी शिलाई मशीनचे मोफत वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

सामाजिक संवेदना जपणाऱ्या मुंबई येथील पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे इगतपुरी तालुक्यात नेहमीच उपयुक्त उपक्रम राबवले जातात. गोरगरीब आणि निराधार महिलांसाठी सुद्धा फाउंडेशनतर्फे चांगल्या स्वयंरोजगाराच्या योजना सुद्धा अंमलात येतात. आज मुंढेगाव येथील विधवा असणाऱ्या गरीब महिलेला स्वयंरोजगारासाठी पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे पिको फॉल शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात करण्यात आले. ह्या मशीनमुळे ह्या महिलेला आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.

मुंबई येथील पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या वतीने इगतपुरी तालुक्यात शालेय विद्यार्थी, शाळा, आदिवासी नागरिकांसाठी विविध योजना नेहमीच राबवल्या जात असतात. या उपयुक्त उपक्रमांमुळे सामाजिक कार्यात पेहेचान प्रगती फाउंडेशन आघाडीवर आहे. मुंढेगाव येथील ३ अपत्य असणाऱ्या गरीब महिलेला आत्मनिर्भर करण्यासाठी फाउंडेशनच्या प्रगती अजमेरा यांनी पाऊल उचलले. त्यानुसार आज ह्या गरजू महिलेला पिको फॉल शिलाई मशीनचे प्रगती अजमेरा, अशोक अजमेरा यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी महिलेने फाउंडेशनचे आभार मानून ऋण व्यक्त केले. ह्या मदतीमुळे ह्या महिलेला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होण्यासाठी चांगली मदत होणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!