
इगतपुरीनामा न्यूज – अवैधरित्या गावठी दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना समजताच त्यांनी संबंधित ठिकाणी पोलीसांचे पथक पाठवुन कारवाई केली. यामध्ये सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे दारू रसायन व साहित्य जागेवरच नष्ट केले. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल भामरे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, आवारी, पोलीस हवालदार सागर सौदागर, संतोष नागरे, केशव बस्ते, सोनवणे यांनी केली. याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारातील बोरीची वाडी येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जागेत झाडाझुडपांमध्ये डोंगरातून येणारे पाण्याचे ओहळालगत रविवारी सकाळी छापा टाकण्यात आला. यामध्ये १ लाख ९० हजार रुपये किंमतीचे गावठी हातभट्टीचे ३८०० लीटर रसायन, ५ हजार शंभर रुपये किंमतीचे १७ प्लास्टिकचे १ हजार रुपये किंमतीचे २ लोखंडी ड्रम, २ हजार पाचशे रुपये किंमतीचे जळाऊ लाकडे असा १ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.