इगतपुरी तालुक्यात लवकरच येणार “रयतेच्या भेटीला छत्रपती” : खा. संभाजीराजे छत्रपतींकडून हिंदवी स्वराज्य ग्रुपला मिळाला शब्द

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

इगतपुरी तालुक्यात छत्रपती शिवरायांच्या विचारांवर श्रद्धा असणारे लोक असून शिवरायांच्या वारसदारांवर ही श्रद्धा नेहमीच टिकून आहे. एका शब्दावर ही जनता स्वराज्यासाठी आजही मावळे बनून आपले कर्तव्य पार पाडू शकतात. ह्या रयतेच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी इगतपुरी तालुक्यात दौरा करावा अशी मागणी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी छत्रपतींना केली. संभाजीराजे छत्रपती यांनी ही मागणी लगेचच मान्य केली असून लवकरच “रयतेच्या भेटीला छत्रपती“ हा उपक्रम हिंदवी स्वराज्य ग्रुपचे रुपेश हरिश्चंद्र नाठे यांच्याकडून करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन खा. संभाजीराजे छत्रपती लवकरच इगतपुरी तालुक्यातील जनतेच्या भेटी, युवक आणि शेतकऱ्यांसोबत संवाद यात्रा काढणार आहेत.

हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निवेदन मान्य करून लवकरच कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. हा शब्द दिल्या नंतर सर्व शिवभक्तांनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती घराण्यावर इगतपुरी तालुक्याची भावना आहे. इगतपुरी तालुका प्रभु रामचंद्र व शिवरायांच्या शौर्याने पावन झालेला आहे. छत्रपतींचा दरबारात लोकांना गाऱ्हाणे मांडता यावे,  पुन्हा एकदा तळागाळातील सर्व साधारण युवक, शेतकरी व रयत छत्रपती घराण्यासोबत जोडली जावी या भावनेतुन या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे अशी माहिती हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी दिली. याप्रसंगी घोटीचे माजी सरपंच समाधान जाधव, प्रणव जाधव, संजय कश्यप, शुभम मुठाळ, अतुल बाजरे, संकेत मुठाळ, ऋतिक जाधव, ऋतुराज देशपांडे, सागर मटाले आदींसह मोठ्या संख्येने शिवभक्त हजर होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!