धामणीच्या उपसरपंचपदी सरला नारायण भोसले बिनविरोध : आमदार मणिकराव कोकाटे गटाचे वर्चस्व कायम

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या धामणीच्या उपसरपंचपदी सरला नारायण भोसले यांनी बिनविरोध निवड झाली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक आणि विजयाच्या यशात वाटा असणारे कार्यकर्ते नारायण भोसले यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी सरला भोसले यांचे अभिनंदन केले आहे. बिनविरोध निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. धामणीच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असून त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू असा शब्द नूतन उपसरपंच सरला भोसले यांनी दिला. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सरला भोसले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

माणिकराव कोकाटे यांना सिन्नर विधानसभा निवडणुकीत खेड गटात निर्णायक विजय मिळवून देणाऱ्या शिलेदारांमध्ये नारायण भोसले हे अग्रस्थानी आहेत. त्यांच्या सौभाग्यवतींना धामणी ह्या महत्वपूर्ण गावाच्या उपसरपंचपदी बिनविरोध संधी मिळाली. यामुळे ह्या ग्रामपंचायतीवर कोकाटे यांचे खंदे समर्थक नारायण भोसले यांचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले आहे. आमदार कोकाटे यांच्या माध्यमातून गावात विकासाच्या योजना आणू अशी प्रतिक्रिया नारायण भोसले यांनी दिली.  

सरपंच बन्सी गोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवडणुकीसाठी सरला नारायण भोसले यांच्या एकच अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. माजी सरपंच भाऊसाहेब भोसले, गौतम भोसले, राष्ट्रवादीचे गटप्रमुख माजी सरपंच वसंत भोसले, चेअरमन भगवान भोसले, दशरथ भोसले, नारायण भोसले, नामदेव भोसले, सरपंच बन्सी गोडे, तानाजी भोसले, महेंद्र पगारे, ईश्वर भोसले, बहिरू भोसले, धनंजय भोसले, भगवंता भोसले, सागर भोसले, वाळू सोनवणे, शरद भोसले, बाळू भोसले, भारत सोनवणे, पंढरीनाथ भोसले, प्रवीण भोसले, रुंजा भोसले, गोविंद भोसले, संतोष भोसले, संजय भोसले, ज्ञानेश्वर भोसले, राजेंद्र भोसले, नामदेव भोसले, समाधान भोसले, सुरेश गांगड, निवृत्ती वाकचौरे, सोपान भोसले, लक्ष्मण उघडे, किरण घोटे, जालिंदर लाड, राहुल लाड आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!