टाकेद बुद्रुक सोसायटीवर माजी आमदार शिवराम झोले यांचे वर्चस्व : सर्व १३ जागांवर शेतकरी विकास पॅनलचा विजय

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकेद बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणुक पार पडली. या संस्थेवर माजी आमदार शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांसह शेतकरी विकास पॅनेलने निर्विवाद यश मिळवले आहे. संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने मोठी विजयी सलामी दिली. भटक्या विमुक्त जाती जमाती मधून गोसावी यमुनाबाई माधव यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. इतर १२ जागांवर झालेल्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर केलेल्या मतमोजणीत शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या. माजी आमदार शिवराम झोले यांनी आपल्या संस्थेवर निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांसह माजी आमदार शिवराम झोले यांच्यावर व इतर सहकाऱ्यांवर जनतेने दाखवलेला विश्वासाबद्दल जनतेचे मनापासून आभार मानते.
- रुख्मिणी दुंदा जोशी, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा

आदिवासी कर्जदार खातेदार गटातून माजी आमदार शिवराम झोले, लक्ष्मण शिवराम गभाले, किसन लक्ष्मण घोडे, यशवंत वाळू धादवड, आबाजी हरी बारे, ठका विठ्ठल बांबळे हे निवडून आले. तर विरोधी पॅनलचे बाळासाहेब गोपाळा घोरपडे,  अशोक कमाजी बांबळे, दौलत किसन बांबळे, नंदू ठमा मेमाने हे विरोधी पॅनल सर्वतीर्थ विकास मधून पराभूत झाले. आदिवासी महिला राखीव गटातून शेतकरी विकास पॅनलच्या पार्वताबाई पांडुरंग धादवड, वेणूबाई यादवराव बांबळे या निवडून आल्या, तर विरोधी पॅनलचे सुगंधाबाई गंगाराम जावळे या पराभूत झाल्या. इतर मागासवर्गीय शेतकरी पॅनलचे रामचंद्र परदेशी हे निवडून आले तर विरोधी पॅनलचे दत्तू हरी जाधव हे पराभूत झाले, अनुसूचित जाती जमाती गटातून शेतकरी विकास पॅनलचे विक्रम किसन भांगे हे निवडून आले तर विरोधी पॅनेलचे डॉ. श्रीराम कोंडाजी लहामटे हे मोठ्या फरकाने पराभूत झाले. सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटातून शेतकरी विकास पॅनलचे सुरेश दत्तू बांबळे, निवृत्ती भाऊराव वारंघुसे हे विजयी झाले तर विरोधी पॅनलचे विलास यादवराव बांबळे हे पराभूत झाले. त्यांच्या निवडीचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग बाबा गांगड, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, पांडुरंग वारुंगसे, राष्ट्रवादी युवती आघाडी तालुकाध्यक्षा कु रुख्मिणी दुंदा जोशी, सुनील जाधव, उत्तम भोसले आदींनी स्वागत केले आहे.

हा विजय मतदार बांधव आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे. शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी टाकेद, घोडेवाडी, बांबळेवाडी, शिरेवाडी येथील ग्रामस्थ दुंदा जोशी, रतन बांबळे, लहु घोडे, चिंधु नांगरे, लक्ष्मण स्वारी आदींनी खूप परिश्रम घेतले.
– जगन घोडे, माजी चेअरमन

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!