कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.।महाराष्ट्र उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी संयुक्तपणे जागतिक महिला दिन आयोजित केला होता. याप्रसंगी विधितज्ज्ञ विजयमाला  वाजे, ग्रामसेविका हर्षिता पिळोदेकर, वैशाली आडके,  सुनीता पाटील, योगिता चौधरी, पूनम बर्वे, एस. बी. भालेराव, आर. के. दोंदे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, डॉ. डी. डी. लोखंडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. बी. सी. पाटील, एस के शेळके, प्रा. के. के. चौरसिया उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमात सर्व कर्तृत्ववान महिला आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांनी आपले विचार व्यक्त केले. वैशाली आडके यांनी समाजात नवीन नवीन प्रकारच्या चालीरीती नव्याने येऊ घातलेल्या आहेत. या सर्वांचा सामना करत असताना स्त्रियांनी सजग सतर्क असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. विजयमाला वाजे यांनी आजही महिला सुरक्षित नाही. त्याकरिता महिलांनी कायद्याचा अभ्यास गरजेचे आहे, आपल्या संरक्षणासाठी स्वतः तत्पर असले पाहिजे असे मत व्यक्त केले. पूनम बर्वे यांनी विद्यार्थिनींना आपला अनुभव सांगत असताना येऊ घातलेल्या स्पर्धा आणि त्यांना कसे सामोरे जावे याबाबत आपले मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी समानता कशाप्रकारे प्रस्थापित केली पाहिजे, मुलींनी येणाऱ्या संकटावर कशाप्रकारे मात केली पाहिजे, भविष्यकालीन प्रश्न हाताळण्यासाठी योग्य प्रकारचे ज्ञान आत्मसात करून येणाऱ्या अडचणीवर मात करून भविष्य निर्माण केले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. एस. के. शेळके, सूत्रसंचालन प्रा. एल. सी. देवरे, आभार प्रदर्शन प्रा. आर. आर. जगताप यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापिका,  प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!