इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द काढले. यामुळे त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. नाभिक समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पारंपारिक सलून व्यवसाय करतात. राजकीय भाषण करताना दानवे यांनी नाभिक समाजाची बदनामी केली आहे. त्यामुळे नाभिक बांधव संतापलेले आहेत.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावसाहेब दानवे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांची केंद्रीय राज्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. इगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजाकडून ह्या घटनेचा निषेध केला जात आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सलून असोशिएशन जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, तालुकाध्यक्ष मछिंद्र कोरडे, ॲड. सुनिल कोरडे, नाभिक समाजाचे जेष्ठ नेते अशोक सूर्यवंशी, सचिव किरण कडवे, पत्रकार लक्ष्मण सोनवणे, संपर्कप्रमुख अक्षय दळवी, संतोष सोनवणे, संपत बोराडे, संदीप आंबेकर, गणेश रायकर, राजाराम रायकर, हर्षल सोनवणे, गणेश वाघ, धोंडीराम कोरडे आदी समाज बांधव व सलून असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.