
इगतपुरीनामा न्यूज – २४ मार्चला रात्रीच्या सुमाराला घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारात हॉटेल दिपाली येथे ८ ते १० संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवली. हातात लोखंडी चॉपर, धारदार हत्यारे, दांडके घेवुन फिर्यादी तुषार भोसले, साक्षीदार ऋषिकेश भोसले, दोघे रा. धामणी, ता. इगतपुरी यांना मारहाण केली. यासह दोघांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हॉटेल समोरील वाहनाचेही नुकसान केले म्हणुन घोटी पोलीस ठाण्यात गुरनं १०५/२०२५ भा.न्या.सं. कलम १०९, ११८(२), ११८(१), ११५ (२), सह आर्म अॅक्ट ४/२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोउनि प्रकाश भालेराव, अजय कौटे, पोलीस अंमलदार सचिन देसले, किशोर बोडके, रोहित पगारे, योगेश यंदे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, होमगार्ड बाळु डहाळे, शांताराम सोनवणे यांच्या पथकाने ह्या गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेवुन कारवाई केली आहे.
ह्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग हरिष खेडकर यांनी तात्काळ दखल घेवुन यातील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांनी संगमनेर हद्दीतील हिवरगाव पावसा परिसरातुन हा गुन्हा करणारे आरोपी सुनिल अर्जुन उदावंत, वय १९, रा. घोटी, ता. इगतपुरी, एक विधीसंघर्षितग्रस्त यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार ऋषिकेश शिवाजी पदमेरे, ओमकार भोसले, सार्थक धोंगडे, अर्जुन उदावंत, दिपक बनसोडे, सचिन घाणे व इतर साथीदार यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यातील संशयित आरोपी सार्थक धोंगडे, अर्जुन उदावंत, दिपक बनसोडे, सचिन घाणे हे गुन्हा घडल्यापासुन फरार झालेले आहेत. पोलीस पथक त्यांचा कसोशीने शोथ घेत असुन ह्या गुन्ह्याचा तपास घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहे.