मानवेढे ग्रामपंचायतींची सर्वोत्तम कामगिरी : पदाधिकाऱ्यांना चंदेरी कार्डचे सन्मानपूर्वक वितरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय सर्वेक्षण वर्षातून दोनवेळा करण्यात येते. यामध्ये पत्र ठरलेल्या ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र दिले जाते. इगतपुरी तालुक्यातील मानवेढे ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड मिळाले असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आज गौरव करण्यात आला. मानवेढे ग्रामपंचायतीने सलग ५ वर्ष स्वच्छता सर्व्हेक्षण आणि पाणी स्रोत तपासणी यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. उत्तम कामगिरी केल्याने सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव भागडे आदींचा सन्मान करण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो जिल्हा परिषद गटात मानवेढे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्धल सभापती सोमनाथ जोशी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, पंचायत समिती सदस्य अण्णा पवार यांनी सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव भागडे, ग्रामसेवक गुलाब साळवे, कर्मचारी विशाल पंडित यांना सन्मानित केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!