कवी – जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
राम लक्ष्मण सुदामा सारे,
जमती गांव वेशी !
डाव मांडाया विटी दांडूचा,
जाती गांव शिवापाशी !!
माळ राणावर पोरं जमती,
डाव मांडी झाडापाशी !
फेकून विटी मारी दांडूला,
गडी म्हणे जिंकलोशी !!
विटी दांडूचा खेळ खेळण्या,
देती विटीला हो उशी !
विटीच्या टोका देऊन टोला,
भिरकावी गांव वेशी !!
दांडू गलीमध्ये ठेवून विटी,
कोलवी दुर आकाशी !
सवंगडी सारे टपून बसती,
विटी हाती झेलण्याशी !!
टोपी घेऊन विटी झेलण्या,
सारे धरी ओंजळीशी !
विटी उडतसे दूर अंतरी,
म्हणे फसगत झालीशी !!
ओल्या थुक्याने चिंबून दांडू,
म्हणे मीच जिंकलोशी !
बदलून घ्यावा राज तुम्ही,
जावा विटी झेलण्याशी !!
खेळ खेळुनी विटी दांडूचा,
भटकती राना वनाशी !
आंबट गोड फळे शोधण्या,
फिरे डोंगर कपारीशी !!
विटी दांडू खेळुनी थकलो,
सांगे आई बापाशी !
पोटाला हो भूक लागता,
खाई मिरची भाकरीशी !!
विटी दांडूचा खेळ खेळती,
आपल्याच मायदेशी !
देशी खेळांना जपुया सारे,
डाव मांडू मुलांपाशी !!
वीतभर विटी हातभर दांडू,
खेळ खेळूया मित्रांशी !
निसर्गाच्या कुशीत राहून,
खेळ खेळूया हो देशी !!
( कवी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक आहेत. )