इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व विद्यार्थी विकास मंडळ आयोजित सेंद्रिय शेती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या हस्ते उदघाटन झाले.” याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. इंदरचंद चव्हाण, आदर्श शेतकरी भगीरथ भगत, वैशाली आडके, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. मोहन कांबळे, प्रा. देडे, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी भाऊसाहेब खातळे यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे, रासायनिक खताचा अधिक प्रमाणात वापर केल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर होत असताना दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे अधिक प्रयत्नपूर्वक वाटचाल करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. इंदरचंद चव्हाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असताना सेंद्रिय शेती संदर्भात जागतिक जागरूकता आणि भारतामध्ये सेंद्रिय शेतीचे अलीकडील काळातील महत्त्व वाढत असताना दिसून येत आहे. विशेषतः हरित क्रांतीनंतर भारतामध्ये अन्नधान्यात स्वयंपूर्णता निर्माण झाली. ते रासायनिक बी बियाणे खते त्यांच्यामुळे आपण निर्माण करू शकलो आणि म्हणून आता परत सेंद्रिय शेती किती महत्त्वाची आहे हे काळानुरुप आपल्या लक्षात आलेलेआहे असे मत व्यक्त केले.
दुसरे मार्गदर्शक इगतपुरी परिसरातील आदर्श शेतकरी भगीरथ भगत यांनी वास्तवात सेंद्रिय शेती कशी करावी व मधुमक्षिका पालन व्यवसाय कसा करावा यासंदर्भात मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी भाषणात भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व अगदी पूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात अन्नधान्य वाढ न झाल्याने भारतीय शेतकऱ्यांना रासायनिक खते बी-बियाणे वापरण्यासाठी प्रवृत केले गेले. ते सत्तरच्या दशकामध्ये अन्नधान्य स्वयंपूर्णता त्यामुळे आपण निर्माण करू शकलो. मात्र आपण सशक्त अशा स्वरूपाचं आरोग्य निर्माण करू शकलो नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे आता सेंद्रिय शेती पर्याय म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे असे अमनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. के. पी. बिरारी, आभार प्रदर्शन व्ही. डी. दामले यांनी मानले. या कार्यक्रमात असंख्य विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला.