शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : ७/१२ उताऱ्यावर काही दुरुस्ती करायचीय ? ; मग इगतपुरी येथील शिबिराचा लाभ घ्या..!

हे प्रतिकात्मक फेरफार नोंदीचे छायाचित्र आहे.

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

विभागीय आयुक्त नाशिक विभाग, जिल्हाधिकारी नाशिक यांच्या निर्देशानुसार इगतपुरी येथे महाराजस्व अभियान शिबिर राबवले जाणार आहे. ह्या अंतर्गत संगणकीकृत ७/१२ चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ नुसार दुरुस्ती करण्याबाबतचे शिबीर इगतपुरी येथील नवीन तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. नवीन तहसीलदार कार्यालयातील शासकीय गोदाम आवार येथे मंगळवारी ६ जुलैला शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. इगतपुरी तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना ७/१२ वर काही दुरुस्ती करावयाची असल्यास शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून कागदपत्रांसह अर्ज करावा असे आवाहन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.

सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणेकामी व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान राबविण्यात येते. त्यानुसार ह्या शिबीराच्या ठिकाणी ७/१२ मध्ये विविध प्रकारच्या दुरुस्त्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी ६ जुलैला होणाऱ्या शिबिरात सातबारा उताऱ्यावरील नावात दुरुस्ती, आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे, चुकीची भूधारणा दुरुस्ती करणे, ७/१२ वरील क्षेत्राचे एकक बदलणे, इतर अधिकाराचा प्रकार व उपप्रकार बदलणे, फेरफार रजिष्टर दुरुस्त करणे, कलम १५५ च्या आदेशाने मंजुर फेरफारांची चुक दुरुस्त करणे, आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे, चुक दुरुस्ती फेरफार करणे, ७/१२ क्षेत्रात दुरुस्ती, नवीन ७/१२ तयार करणे, अहवाल १ ची दुरुस्ती करणे, ७/१२ खाता दुरुस्ती करणे ह्या कामांचा समावेश आहे.

इगतपुरी येथील नवीन तहसीलदार कार्यालयातील शासकीय गोदाम आवारात मंगळवारी ६ जुलैला हे शिबिर होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत शिबिराची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. ह्या शिबिराचा इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!