इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातुन लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी सुमारे दिड कोटी रूपयांच्या निधीला जनसुविधा योजनंतर्गत मंजुरी मिळाली आहे. या मंजुर कामांमध्ये इगतपुरी तालुक्यातील सहा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार, सिन्नर तालुक्यातील तीन तर नाशिक तालुक्यातील दोन अशा पंधरा विकास कामांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत मंजुर झालेल्या विकास कामाचा शुभारंभ होणार असून प्रत्यक्ष कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी खासदारगोडसे सततच प्रयत्नशील असतात. जनसुविधा योजनेतंर्गत विकास कामांसाठी निधी मंजुर व्हावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खा. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जनसुविधा योजनेतंर्गत पंधरा विकास कामांसाठी सुमारे दिड कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमध्ये इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे दशक्रिया विधी शेड बांधणेकामी दहा लाख, बारशिंगवे येथे स्मशानभूमी घाट बांधणेकामी पाच लाख, नांदुरवैद्य येथे स्मशानभूमी घाट व निवारा शेड बांधणेकामी दहा लाख, सांजेगाव येथे स्मशानभूमी व अनुषंगिक कामे करणेकामी दहा लाख, सोनोशी स्मशानभूमीच्या कामासाठी पाच लाख व भावली खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणेकामी पंधरा लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील शिवडे स्मशानभूमी अनुषंगीक कामांसाठी दहा लाख, पंचाळे येथे स्मशानभूमी शेड बांधणेकामी दहा लाख, नळवाडी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामासाठी दहा लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहोळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणेकामी पंधरा लाख, बोंबीटेक ( अंबोली ) स्मशानभूमी बांधकाम करणेकामी पाच लाख, बेरवळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणेकामी पंधरा लाख, अस्वली हर्ष येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणेकामी दहा लाख रूपयांचा निधी तर नाशिक तालुक्यातील शिलापुर येथे घाट बांधणेकामी दहा लाख व चांदगिरी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामासाठी दहा लाख रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. निधी मंजुर झालेल्या विकास कामांचा प्रारंभ येत्या काही दिवसांत होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.