वाडीवऱ्हे जवळ अपघातात घोटीचे दोघेजण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे येथील दत्त मंदिराजवळ मोटारसायकलचा आज रात्री साडेसातला अपघात झाला. ह्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

MH 15 FZ 2584 ह्या मोटार सायकलवरून नाशिककडून मुंबईच्या दिशेने चालले होते. यावेळी अचानक मोटारसायकल स्लिप झाल्याने अपघात झाला. यामध्ये चंद्रकांत संजय कोरडे वय 28, संदीप लक्ष्मण सिंग वय ३० दोघे राहणार घोटी हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!