महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची नाशिक येथे १ मार्चला राज्यस्तरीय महामंडळ सभा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

प्राथमिक शिक्षकांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही ख्यातनाम संघटना आहे. या संघटनेची राज्यस्तरीय महामंडळ सभा नाशिक येथे 1 मार्चला जय गुरुदत्त लॉन्स याठिकाणी संपन्न होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या या महामंडळ सभेसाठी केंद्रीय मंत्री ना. डॉ. भारती पवार, पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ, कृषिमंत्री ना. दादाभाऊ भुसे, खासदार हेमंत गोडसे, आदींसह संघटनेचे राज्यस्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर या महामंडळ सभेत चर्चा होणार असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे नियोजन देखील याठिकाणी केले जाणार आहे.  1914 साली स्थापन झालेल्या या संघटनेच्या राज्याध्यक्ष पदाची धुरा प्रथमच नाशिक जिल्ह्यातील अंबादास वाजे यांच्या खांद्यावर आली असून  सुमारे वीस वर्षानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा होत आहे. या महामंडळ सभेसाठी सर्व शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, जिल्हा सरचिटणीस धनराज वाणी, विनायक ठोंबरे, बाजीराव सोनवणे, निवृत्ती आहेर, संजय शेवाळे, इगतपुरी तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे व सरचिटणीस भिला अहिरे यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!