रचना : जी. पी. खैरनार, नाशिक ९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
माय मराठी गाऊ गुण गान !
शब्द सुमनांची मोठी खाणं !!
माय मराठी आमची शान !
मनी पेटवी भाषाभिमान !!
साऱ्या धर्माचे एकच स्थान !
माय मराठी असती महान !!
गुणी माय मराठीचा बहुमान !
सारे भारतीय करी सन्मान !!
मराठी आमचा स्वाभिमान !
उरी जागवी देश अभिमान !!
साऱ्या धर्माचे आदर स्थान !
मराठी भाषाच शोभे छान !!
मराठीचा असे अभिमान !
लोक सेवेचे मिळे वरदान !!
माय मराठी आमची महान !
आम्ही माय मराठीचे संतान !!
आम्ही भारतीय घेतो आन !
मराठी आमुची स्फूर्तीस्थान !!
माय मराठी आमुचा प्राण !
श्वासात मराठी पंचप्राण !!
साऱ्या जगात पेटवू एकच रानं !
मराठी भाषाच असे गुणवान !!
भाषा रक्षीण्या देऊ बलिदान !
निष्प्रभ करु कट कारस्थान !!
माय मराठीचे बहू संतान !
संत महंत रूप जन्मे महान !!
माय मराठी असे शीलवान !
सूर्य चंद्र सुद्धा दिसे लहान !!
बळी तुडवतो सारे रानं !
मराठीस देऊनी सन्मान !!
गाऊनी मराठीचे गोड गान !
जय जवान, जय किसान !!