न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज टाकेद येथे २५ फेब्रुवारीला कविसंमेलन : खुल्या कविता स्पर्धांचे होणार पारितोषिक वितरण

नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

जागतिक मराठी भाषा दिन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज टाकेद ता. इगतपुरी येथे निमंत्रित कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा व टाकेद माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर काँलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता कवीसंमेलन होणार आहे अशी माहिती प्राचार्य टि. जी. साबळे व परिषद जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांच्या वतीने परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक देविदास खडताळे यांच्या वाढदिवसानिमित्त नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर काँलेज टाकेद यांच्या सहभागातुन विद्यार्थ्यांसाठी खुल्या कविता स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धा ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या होत्या. प्राचार्य साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी ही स्पर्धा तीन गटात घेतली होती. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभागी होत उदंड प्रतिसाद दिल्याची माहिती प्राचार्य साबळे यांनी दिली आहे. दरम्यान जागतिक मराठी भाषा दिन तथा कविवर्य कुसुमाग्रज जयंतीनिमित्त शुक्रवारी २५ फेब्रुवारीला या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने निमंत्रित कवींचे कवीसंमेलन होणार आहे. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे हे असणार आहेत. या कविसंमेलनात जिल्हाध्यक्ष तथा साहित्यिक नवनाथ अर्जुन पा. गायकर, युवाकवी तथा महाराष्ट्र टाईम्सचे उपसंपादक प्रशांत भरवीरकर, कवयित्री आशा गोवर्धने व लेखक नारायण गडाख सहभागी होणार आहेत. स्वागताध्यक्ष प्राचार्य साबळे हे असणार असुन सुत्रसंचालन कवी राजेंद्र गायकवाड हे करणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!