आगामी काळात युवकांची भूमिका निर्णायक ठरणार – ना. बाळासाहेब थोरात

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. त्यात नाशिकला झुकते माप मिळाले. राज्य कार्यकारिणीत सर्वांत तरुण ग्रामीण चेहरा इगतपुरी येथील भास्कर गुंजाळ यांचा चिटणीस म्हणून समावेश झाला.
गुंजाळ यांचा सत्कार महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. त्याप्रसंगी ना. थोरात यांनी युवकांची भूमिका येणाऱ्या काळात महत्त्वाची आहे. मोदी लाटेतही इगतपुरी सारख्या आदिवासी मतदारसंघात ताकद दाखवत जिल्ह्यात एकमेव आमदार निवडून देण्याचा विक्रम केला असल्याने राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाला दखल घेण्यास भाग पाडल्याचे गौरवोद्गार काढले.

या कार्यक्रमास पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार अनिल आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार काशिनाथ बहिरम, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, नवनिर्वाचित चिटणीस प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडोळे, सुमित्रा बहीरम, उत्तमराव भोसले, भारत टाकेकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष व जेष्ठ नेतृत्वाने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यास पात्र होण्याची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. इगतपुरीसह जिल्ह्यातील प्रश्नांसाठी व पक्षबळकटीसाठी आमदार महोदयांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करू. नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ करू.

- भास्कर गुंजाळ, चिटणीस,  प्रदेश काँग्रेस कमिटी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!