
कवी - जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२४०२१
अनवाणी पायांना तुमच्या,
वाटेत टोचतील खूप काटे !
पण दूर सारत वाट काढत,
द्या साऱ्या काट्यांना फाटे !!
स्वप्न बाळगा छान उराशी,
आम्ही होऊ देशासाठी मोठे !
ध्येय धैर्याचे कौतुक पाहून,
आई बापास अभिमान वाटे !!
शेतकरी व्हा, कामगार व्हा,
राजकारणी व्हा तुम्ही मोठे !
जाण असावी मनात तुमच्या,
समाजाचे ऋण फेडू कोठे !!
कर्तृत्वाची गुढी उभारण्या,
आयुष्यात वेचा कष्टाचे झटे !
अपमान गिळूनी समाजाचा,
सन्मान घेण्यास द्यावे फाटे !!
जाती धर्माच्या बंधन बेड्या,
गांव वेशी नसाव्यात कोठे !
मानव सेवा संकल्प करुनी,
दीन दुर्लबास करावे मोठे !!
त्याग करा हाव संपत्तीचा,
न होती मानव जाती तोटे !
डाम डौल मानव लक्षण,
भविष्य त्याचे सारे खोटे !!
अंधश्रद्धा बुवाबाजीचे,
खूळ असती सारे खोटे !
शिक्षणाची कास धरुनी,
घडवा वैज्ञानिक मोठे !!
क्षणभंगुर जन्म मानवाचा,
मृत्यू येईल नवीन पहाटे !
नाशिवंत देह मानवाचा,
दिसणार नाही तो कोठे !!
मानव अवतारी दानवाचे,
रूप दिसतसे खूप छोटे !
संपत्तीच्या हव्यासापायी,
दानव मानवाचे गळे घोटे !!
जन्म आणि मरणांमधले,
आयुष्य मानवा असे छोटे !
मानवता हीच खरी संपदा,
मृत्यूसमयी त्यास खरे पटे !!
कवी जी. पी. खैरनार हे नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक असून त्यांची अनेक पुस्तके, कविता प्रसिद्ध आहेत.