इगतपुरीनामा न्यूज, दि. 25
प्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यात दिव्यांग बांधवांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. शासन दरबारी योग्य पाठपुरावा करून दिव्यांग बांधवांना न्याय देण्यासाठी नितीन गव्हाणे यांची मोलाची भूमिका असते. वेळोवेळी सर्व दिव्यांग बांधवांना एकत्र आणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ व दिव्यांग ५% निधी खर्च करण्यासाठी त्यांनी काम केलेले आहे. संजय गांधी पेन्शन योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना लाभ देण्यासाठी इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम आहे. त्यानुसार नाशिक येथे जिल्हा कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते नितीन गव्हाणे पाटील यांची तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. दिव्यांग बांधवांच्या हितासाठी आणि ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांचे जोमाने काम करण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन श्री. गव्हांणे यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केले.