इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई व मराठा विद्या प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बंदिस्त प्रेक्षागृह बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन महाविद्यालयाच्या प्रांगणात मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या मंजुरीसाठी आमदार हिरामण खोसकर, मविप्रच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, संस्थेचे पदाधिकारी, संचालक तसेच प्राचार्य डॉ. व्ही. जे. मेधणे यांचे सहकार्य लाभले.
भूमीपूजनाच्या या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम कोकणे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य रोहिदास उगले, जयंत गोवर्धने, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब वालझाडे, सुनिल रोकडे, विजय कडलग, संतु पाटील खातळे, निवृत्ती जाधव, पंढरीनाथ बऱ्हे, समाधान गुंजाळ, सागर बऱ्हे, संजय जाधव तसेच कॉन्ट्रॅक्टर रवींद्र घेगडे, आर्किटेक्चर प्रवण प्रकाश जगताप, इंजिनिअर सुनिल कुशारे, तुषार बोरा, पुजारी प्रविण रोडे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर, डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा। एस. एस. परदेशी, प्रा. एच. आर. वसावे उपस्थित होते.