इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलातील ( आरपीएफ ) गुन्हे गुप्तचर शाखेने ( CIB ) मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कॉन्स्टेबल नीळकंठ गोरे, विनोद राठोड आणि विजय पाटील यांचा समावेश असलेल्या सीआयबीच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून अमरावतीहून आलेला सेंधराम खुमाराम हा हवालाची रक्कम पोहोचवण्यासाठी दादर स्टेशन प्लॅटफॉर्म क्र १ वर थांबला होता. त्याची आरपीएफ पोस्टवर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, उपसंचालक आयकर ( अन्वेषण ) मुंबई आणि सीआयबी टीमच्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली आणि त्याच्याकडून ६७ लाख ४४ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.