
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील इगतपुरी हिल्स ह्या हॉटेलमधील एका रूममध्ये आनंदा निवृत्ती दोंदे वय 34 रा. टिटोली शिवार इगतपुरी ह्या युवकांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. इगतपुरी हिल्स या हॉटेलमध्ये हा युवक कामाला होता. त्याने हॉटेलच्या रुममध्ये शनिवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास गळफास घेतला. याबाबत माहिती समजल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्याला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासुन मयत घोषीत केले आहे. संतोष बाळु दोंदे, वय २७ वर्षे, रा. तळेगाव राजवाडा यांनी दिलेल्या खबरीवरून इगतपुरी पोलिसांनी आज अकस्मात मृत्यु दाखल केला आहे. वरिष्ठांचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.