प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी तालुक्यातील मुरंबी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मते यांची निवड झाली आहे. शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारिणी निवडीसाठी जिल्हा परिषद शाळेत पालकांची विशेष बैठक घेण्यात आली. त्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यात नविन समितीच्या अध्यक्षपदासाठी शंकर शिवाजी मते यांच्या नावाची तर उपाध्यक्षपदी शिवाजी गायत्री मते व सदस्यपदासाठी राजाराम मते, सविता मते, शरद महाले, सुकदेव बागुल, सीता पोटिंदे, पूजा शिरसाठ, शिवाजी मते, उपाध्यक्ष सविता गोरख मते आदींच्या नावाची सर्वानुमते शिफारस करण्यात आली. त्यास उपस्थित सर्व पालकांकडून अनुमती देण्यात आल्यानंतर शंकर मते यांची अध्यक्षपदी निवड झाली.
माजी अध्यक्ष बापु मते व समितीचे सर्व माजी सदस्य तसेच शिक्षकवृंद व पालकांकडून नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर मते यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. निवडीप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बापू मते, माजी अध्यक्ष गोकुळ मते, मनविसेचे उपजिल्हाप्रमुख आत्माराम मते, संतोष मते, दत्तू मते, गणेश मते, बाळु मते, धनंजय मते, राजू मते, सुनील पालवे, सुकदेव बागुल, मुख्याध्यापक सुनीता देवरे, सुरेखा देवरे, शारदा आहिरे, गोपाळ राठोड, सुरेश निकम, वंदना सायंकर, कमलाकर जाधव, लता बोदांर्डे उपस्थित होते.