इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील निष्काम कर्मयोगी श्री संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी नासाका बचाव कृती समिती अध्यक्ष विलास विष्णुपंत गायधनी यांची निवड झाली आहे. संस्थेचे व्हॉइस चेअरमन आत्माराम दाते सचिव, आणि संचालक मंडळाने एकमताने ठराव करुन त्याची नियुक्ती केली. तीन हजार सभासद असलेली ही नागरी सहकारी पतसंस्था तालुक्यातील सभासदांना मोठा दिलासा देणारी आहे. या निवडीबद्दल नासाका कामागार पतसंस्था, नासाका कामागार युनियन, पंचक्रोशीतील ग्रामस्थानी अभिनंदन केले.
यावेळी सर्व सभासद, शेतकरी कामगार यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि हिताच्या दृष्टीने सगळ्यांना सोबत घेऊन कामकाज करण्यासाठी माझी निवड झाल्याचे नवनिर्वाचित संचालक विलास विष्णुपंत गायधनी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या. व्हॉइस चेअरमन आत्माराम दाते, सचिव पाडुरंग मोंढे, संचालक नारायण मुठाळ, भगवान आडके, चंद्रभान सांगळे, भास्कर गायधनी, बाळासाहेब तेलोरे, लिलाबाई गायधनी, हेमंत गोसावी, लिपिक नंदु सहाणे असू मान्यवर उपस्थित होते. तत्कालीन चेअरमन स्व. विष्णुपंत वाळुजी गायधनी यांचे विलास गायधनी हे चिरंजीव आहेत.