महामार्गावर एकाचवेळी दोन अपघातात २ युवक गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6

मुंबई आग्रा महामार्गावर आज दोन अपघात झाले. पहिल्या अपघातात घोटीकडून नाशिकच्या दिशेने जाणारी मोटारसायकल घसरल्याने पाडळी देशमुखजवळ अपघात झाला. यामध्ये राहुल सोमनाथ शिंदे वय 26 रा. पाथर्डी फाटा नाशिक हा युवक गंभीर जखमी झाला. दुसरा अपघात रायगडनगर भागात गाय अचानक आडवी आल्याने झाला. यामध्ये राकेश शांताराम मांडे वय 30 रा. बेलगाव ढगा ता. जि. नाशिक हा युवक गंभीर जखमी झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. एकाच वेळी दोन विविध ठिकाणी अपघात झाला असूनही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेने दोन्ही ठिकाणी मदतकार्य केल्याने उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!