इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
वृत्तवाहिनीवर टीव्हीवरील धामडकीवाडी शाळेची बातमी भरारी ही बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित झाली. ही बातमी पाहून डॉ. स्वप्नाली कर्णिक यांनी त्यांचे सासरे मुंबई येथील रविंद्र कर्णिक सेवानिवृत्त शिक्षक यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेसाठी अत्यावश्यक मदत देण्याचे नियोजन केले. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामडकीवाडी शाळेतील प्रमोद परदेशी यांनी राबविलेल्या टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी ह्या अभिनव पॅटर्न बाबत माहिती घेतली. कोरोना काळात अतिशय दुर्गम आदिवासी भागात टीव्हीद्वारे अखंडित शिक्षण सुरू असल्याचे पाहून त्या आनंदीत झाल्या.
डॉ. स्वप्नाली कर्णिक यांनी फोन द्वारे शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांच्याशी संपर्क साधून शाळा व वाडीतील ग्रामस्थांबाबत माहिती घेतली. चर्चेनुसार डॉ. स्वप्नाली कर्णिक यांनी रविंद्र कर्णिक यांचे पुतणे प्रशांत तारकर यांच्या मार्फत शाळेला दर्जेदार मेगाफोन, सर्व विद्यार्थ्यांना चप्पल व मास्क पोहच केले. वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. वाडीतील महिलांनी औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे शिक्षक दत्तू निसरड, गोकुळ आगिवले, बबन आगिवले, लहानू आगिवले आदींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. स्वप्नाली कर्णिक यांनी पाठवलेल्या अनमोल भेटीबाबत मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली.