
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
जोपर्यंत विनाअट वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणाऱ्या शेतकऱ्यांवर वाडीवर्हे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्यांसह शेतकर्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. १०० पेक्षा जास्त शेतकर्यांना पोलिसांच्या वाहनातुन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्याच्या सर्व भागात शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पाठिंबा व्यक्त होत असून वीज वितरण कंपनी सर्वच शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय करीत असल्याची भूमिका घेतली जात आहे. इगतपुरी तालुक्यात महिला आंदोलकाने केलेल्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात म्हटले आहे की, मी घरून सांगून आली आहे की जोपर्यंत लाईट चालू होत नाही तोपर्यंत माझा जामीन सुद्धा देऊ नका.
व्हिडिओ पहा
