इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
आदिवासींच्या विकासासाठी काँग्रेस व गांधी घराण्याने सदैव दूरदृष्टी ठेवत कार्य करण्याचा सपाटा लावल्यानेच सर्वात जास्त योजनेंचा फायदा आदिवासी जनतेला झाला असल्याचे आमदार हिरामण खोसकर म्हणाले. खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अतिदुर्गम अशा गिरेवाडी येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी केले होते. यावेळी ज्या गांधी घराण्यावर नियतीने अनेक आघात केले परंतु शांत व संयमाने सोनिया गांधी यांनी देशाची धुरा सांभाळून देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावला त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे असे वक्तव्य गुंजाळ यांनी केले.
सुरुवातीला मुंबई येथील साई सेवा संघ यांच्या आरोग्य पथकाने नेत्ररोग तपासणी केली. त्याचे उदघाटन आमदार खोसकर यांनी केले. याठिकाणी जवळपास 220 लोकांनी याचा लाभ घेतला असून ज्यांना ऑपरेशनची गरज आहे अशा लोकांची जबाबदारी गुंजाळ यांनी घेतली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ हे होते. तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले, बाळासाहेब कुकडे, बाळासाहेब वालझाडे, निवृत्ती कातोरे, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, महिला अध्यक्षा सविता पंडित, प्रकाश पंडित, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे, बाळासाहेब लंगडे, प्रकाश तोकडे, युवक शहराध्यक्ष गणेश कौटे, तालुका सरचिटणीस योगेश सुरुडे आदी हजर होते. याप्रसंगी गिरेवाडी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार खोसकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला सरपंच बच्चू गिरे, विजय गुंजाळ, रेवणनाथ गुंजाळ, मुख्याध्यापक नंदकुमार फाकटकर, ग्रा. पं. सदस्य नथु गिरे, माजी सरपंच बबन गिरे, पिलाजी गिरे, गंगाराम गिरे, संपत मुसळे, विजय झनकर, तानाजी शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते