इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
माणिकखांब येथील जिल्हा परिषद शाळेला आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून दर्जेदार संगणक देण्यात आला. यावेळी आगरी समाज विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण यांच्या प्रयत्नातून व डॉ. सुधीर तांबे यांचे विश्वासु कार्यकर्ते मिलिंद कुकडे यांच्या विशेष प्रयत्नातुन ही मदत मिळाली. मुख्याध्यापक राजेंद्र मोरकर यांच्याकडे संगणक सुपूर्द करण्यात आले. यावेळी शालेय समिती व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे स्विय सहाय्यक मिलिंद कुकडे यांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच अंजना चव्हाण मुख्याध्यापक राजेंद्र मोरकर, आगरी समाजाचे सचिव भोलेनाथ चव्हाण, शिवसेना शाखा प्रमुख भारत भटाटे, पालक समिती अध्यक्ष काळु बन्सी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती चव्हाण, रतन भटाटे, मच्छिंद्र चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुकराज म्हसणे, भगवान भटाटे, अशोक कुमावत, दिगंबर बघाड आदी उपस्थित होते. मिलिंद कुकडे यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यात आमदार डॉ सुधीर तांबे यांनी लक्ष घालून यापूर्वी सुध्दा अनेक शाळांना संगणक दिले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना याचा शिक्षणात फायदा होईल. एसएमबीटी महाविद्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत असून इगतपुरी तालुक्याचे नाव नकाशावर आणण्याचे काम आमदार डॉ. तांबे यांनी केले आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते