गोंदेच्या महिंद्रा कंपनीतर्फे मुकणे शाळेला इंन्ट्रॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टर भेट : सुसज्ज इंन्ट्रॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टर मिळणारी मुकणे जिल्हा परिषद शाळा ठरली जिल्ह्यातील पहिली शाळा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

मुकणे येथील जिल्हा परिषद शाळेला गोंदे महिंद्रा कंपनीकडून इंन्ट्रॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टर बेट देण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम अगोदरच या इंन्ट्रॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टरमध्ये असणारी जिल्ह्यातील मुकणे जिल्हा परिषद शाळा आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकवर्गात आनंद व्यक्त करण्यात आला.
स्वखर्चाने वेगवेगळे उपक्रम गावोगावी भेट देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गोंदे औद्योगिक वसाहतीमधील महिंद्रा इंटरट्रेड कंपनी आहे. त्यांनी मुकणे गावी या आधीही सुसज्ज अंगणवाडी इमारत, शाळेसाठी शौचालय इमारत आदी लाखोंचे कामे दिलेली आहेत. त्यातच आज मुकणे जिल्हा परिषदेच्या शाळेला सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम असलेला इंन्ट्रॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टर भेट दिला आहे. इतका महागडा व सुसज्ज इंन्ट्रॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टर भेट मिळणारी मुकणे जिल्हा परिषद शाळा ही नाशिक जिल्ह्यातील पहिलीच शाळा ठरली आहे. कंपनीचे व्यवस्थापक संदीप दुसाने, घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव यांच्या हस्ते आज या संचाचे फीत कापुन उदघाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अशोक राव, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने कंपनी व्यवस्थापनाने आजवर सर्व कामे झाले असल्याने त्यांचाही सन्मान शाळेचे सर्व शिक्षक व ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला. कंपनीचे व्यस्थापक संदीप दुसाने यांचा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसह ग्रामपंचायतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महिंद्रा कंपनी व्यवस्थापक संदीप दुसाने, अंकुश श्रीवास्तव, स्वप्नील धांडे, बाजार समितीचे संचालक विष्णु राव, माजी सभापती गणपत राव, सरपंच हिरामण राव, ज्ञानेश्वर राव, चंद्रभान बोराडे, संतोष जाधव, दिलीप रोडे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव, निवृत्ती आवारी, अशोक राव, मोहन बोराडे, पोपट वेल्हाळ, ग्रामसेवक दीपक पगार, मुख्याध्यापिका कल्पना महिरे, वंदना पाटील, सरला देवरे, निता गोसावी, प्रमिला जगताप, प्रतिभा पाटील, प्रशांत चव्हाण, नारायण बोराडे, बाळु आवारी, गोकुळ शिरसाठ, नारायण गोवर्धने, सुनील राव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका निता गोसावी यांनी तर प्रास्ताविक ग्रामसेवक दीपक पगार यांनी केले. आभार मुख्याध्यापिका कल्पना महिरे यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!