इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नागरी विकास सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार नागरी विकास सेल अध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांनी पत्राद्वारे निवड केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल बेन पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुवा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस उत्कर्षा रुपवते, प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. इगतपुरी तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी यावेळी बाळासाहेब वालझाडे यांचे अभिनंदन केले.
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे, जेष्ठ नेते जनार्दन माळी, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, सरचिटणीस रामदास पाटील धांडे, निवृत्ती कातोरे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, विधानसभा अध्यक्ष किरण पागेरे, बाळासाहेब लंगडे, बाळासाहेब कुकडे, अरुण गायकर, ज्ञानेश्वर कडू, ज्ञानेश्वर खातळे, चंदू किर्वे, बाबूराव भोर, गोपाळ भगत, नंदू पिचा, सुधाकर दुर्गुडे, ज्ञानेश्वर लहामगे, सोमनाथ कुंभार, लहू तोकडे, संतोष सोनवणे, संतोष जगताप, प्रकाश पंडित, महिला अध्यक्षा सविता पंडित, राजु गांगड, शांताराम क्षीरसागर, रघुनाथ किर्वे आदींनी बाळासाहेब वालझाडे यांचे अभिनंदन केले आहे