इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले महाविद्यालयाचे विद्यार्थी राहुल कोकाटे, वैभव गाढवे, राजेश दोंदे, आकाश गायकर, किरण भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. याप्रसंगी मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य संतू पाटील खातळे, जयंत गोवर्धने, वैशाली आडके, अध्यक्ष शांताराम कोकणे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. एस. एस. परदेशी, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. डी. लोखंडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एच. आर. वसावे, पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर उपस्थित होते.
याप्रसंगी संरक्षण क्षेत्रात निवड झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व नॅकच्या समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. भाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ। पी. आर. भाबड यांनी मार्गदर्शन केले. ध्वजारोहण कार्यक्रमाचे नियोजन प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. एच. आर. वसावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी तर आभार प्रा. डॉ. डी. डी. लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.