मारहाण प्रकरणी शेतकरी संघटनेचे इगतपुरीत निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

परभणी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन दैठण येथील पोलीस कर्मचारी बळीराम मुंडे ब. नं. 825 यांनी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष माधवराव शिंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. संबंधित पोलिसाला त्वरित निलंबित करावे, यासह नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने ह्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवणारे निवेदन ई-मेल द्वारे विशेष पोलीस निरीक्षक जिल्हा बीड व जिल्हा नाशिक यांना पाठविण्यात आले.

प्रत्यक्ष उपस्थित राहून इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदनाची प्रत देण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ, तालुकाध्यक्ष किसन मामा शिंदे, तालुका संपर्कप्रमुख रामदास गायकर, शरद गायकर उपस्थित होते.