प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्यावर होणाऱ्या अवमानकारक घटनेचा निषेध करीत तेथील संबंधित गुंडावर कारवाई करावी. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील शेतकऱ्याच्या गायींची अज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आली त्या संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लहांगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज इगतपुरी काँग्रेसच्यावतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनांद्वारे केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले हे भंडारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी फिरत असतांना स्थानिक गुंडाकडुन त्रास देण्याचा जाणुन बुजून होत असलेल्या घटनेबाबत कारवाई करावी. अन्यथा निषेध मोर्चाचा अवलंब केला जाणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील शेतकऱ्याच्या गायींची अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातुन नेऊन मिलिटरी हद्दीत गायींची कत्तल करण्यात आल्याची घटना घडली. अशा समाजकंटकांवर कारवाई करावी, शेतकऱ्यास नुकसानभरपाई द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देतेवेळी काँग्रेस नेते तथा घोटी बाजार समितीचे मुख्य प्रशासक ॲड. संदीप गुळवे, काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव , कांग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लहांगे, माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, कार्याध्यक्ष अरुण गायकर, कैलास घारे, सत्तार मणियार, संपतराव काळे, सोमनाथ भोंडवे, रामदास मालुंजकर, मल्हारी गटकळ, हिरामण दुभाषे, भगवान वाकचौरे, बाळासाहेब कुकडे, संपतराव मुसळे, संजय खातळे आदींसह इगतपुरी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.