शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या मागण्यांसाठी नीता वारघडे यांची अधिकाऱ्यांशी चर्चा : प्रश्न न सुटल्यास मंत्रालयात महिलांसह उपोषण करण्याचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – शालेय पोषण आहार योजनेद्वारे आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मायेचा घास भरवणाऱ्या महिलांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. माध्यान्ह भोजन योजनेसाठी महिलांना महिनाभर कमी उत्पन्नात राबावे लागत आहे. ह्या पार्श्वभूमीवर आदिवासी नारीशक्ती बहुउद्धेशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निता सुरेश वारघडे यांनी नाशिक जिल्ह्यातील महिलांशी हितगुज करून समस्या जाणून घेतल्या. यावेळी शालेय पोषण आहार कंत्राटी कामगार महिलांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, खासदार हेमंत गोडसे, आमदार यांना घेराव घातला. सर्वांना मागण्यांचे निवेदन देत चर्चा करून शासन दरबारी गाऱ्हाणे मांडण्याची विनंती केली. शालेय पोषण आहार योजना कंत्राटी कामगारांच्या हक्काच्या व न्यायिक मागण्या मान्य केल्या नाही झाल्या तर मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असे निता वारघडे यांनी सांगितले.

जागतिक महिला दिन साजरा करीत असतांना कष्टकरी महिला “दीन” झाल्या असून ह्याला शासनाचे उदासीन धोरण जबाबदार असल्याचे आदिवासी नारीशक्ती बहुउद्धेशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निता सुरेश वारघडे यांनी यावेळी सांगितले. मोर्चाप्रसंगी संतोष भगत, बळवंत दळवी, विठ्ठल भाऊ, शकुंतला ठाकरे भास्कर भाऊ, रंगूताई कोकणे, लता महाले, अनिता वाघमारे, ज्योती डोके, सुनीता डोके, सोनी दोरे, बाळू गावंडा, मंगळ सावंत, योगिता वाकचौरे, शालू हंबीर, जया भगत, सुलोचना जाधव, कमलाकर गायकवाड, कृष्णा मुर, धर्मराज भोये, साईनाथ गावंडा, अरुण गावंडा आदींसह नाशिक जिल्ह्यातून महिला आणि कार्यकर्ते हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!