अल्पावधीत ग्रामविकास साधणाऱ्या मोडाळे येथे बॅटरीवर चालणारी घंटागाडी : जि. प. सदस्या अनिता गोरख बोडके यांच्या साहाय्याने वाहनाचे लोकार्पण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

स्वच्छता म्हणजे साक्षात लक्ष्मी….ह्या लक्ष्मीच्या निवासाने समृद्धी यायला मदत होते. यासाठी अनेकांचे हात ह्या कामाला उपयोगी ठरतात. यासह गावाला बदलून टाकण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधींची आवश्यकता असते. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावातही स्वच्छता नांदण्यासाठी आणि भरभराट येण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या अनिता गोरख बोडके सातत्याने सक्रिय असतात. त्यांच्या अनमोल सहकार्याने बॅटरीवरील कचरा संकलन करणाऱ्या वाहनाचे लोकार्पण मोडाळेकरांसाठी दिमाखात करण्यात आले. गावांमध्ये अरुंद रस्त्यांमुळे कचरा संकलन करणारे मोठे वाहन जायला यायला अडचणी असल्याने छोट्या वाहनांची संकल्पना यशस्वी होणार आहे. बॅटरीवर चालणारे वाहन असल्याने इंधनाचा खर्च बचत होऊन ग्रामविकास साधण्यासाठी फायदा होणार आहे. मोडाळे गावाचा इगतपुरी तालुक्यातील गावांनी आदर्श घेऊन प्रेरणादायी कार्य घडवावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावाने विविध क्षेत्रात विकास साधला आहे. सर्वांगीण विकासासह शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा वाढली आहे. ग्रामविकासासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके सदैव तत्पर असतात. आगामी काळात सुद्धा मोडाळे गावाला राज्याच्या नकाशावर अव्वल कामगिरी करून झळकवण्यासाठी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. सर्व विकास साधत असतांना दैनंदिन जमा होणारा ओला आणि सुका कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्या अनिता गोरख बोडके यांनी बॅटरीवरील कचरा संकलन करणाऱ्या वाहनाचे साहाय्य गावकऱ्यांसाठी केले आहे. गावातील गल्ली बोळातुन आणि अरुंद जागांमधून हे वाहन सहज जाऊ शकते. बॅटरीवरील वाहनामुळे इंधनाचा खर्च सुद्धा वाचणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी सांगितले की, मोडाळे गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामविकास साधला असून आमच्या गावाप्रमाणे अन्य गावांनीही प्रगतीचा आदर्श घ्यावा.

Leave a Reply

error: Content is protected !!