काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग निदान शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा ९ डिसेंबरच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील जनता केंद्रबिंदू आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पोहोचाव्यात या हेतूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस भास्कर गुंजाळ यांनी १० डिसेंबरला सकाळी १० वाजता मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन मारुती मंदीर तळोशी ता इगतपुरी येथे केले आहे. या शिबिराचे उद्घाटन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते होत असून मुंबई येथील साई सेवा संघ यांचे नामांकित डॉक्टर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व मान्यवर हजेरी लावणार असल्याने नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भास्कर गुंजाळ यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!