खासदार नरेंद्र जाधव यांच्या निधीतून इगतपुरी तालुक्यातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

केंद्र सरकारच्या योजनेतून खासदार यांना निधी मिळतो त्या निधीतून विकास कामासाठी माध्यमिक शाळांना ई लर्निंग साहित्य वाटप केले जाते. त्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळांना ई लर्निंग साहित्य वाटप करण्यात आले. खासदार नरेंद्र जाधव यांच्या खासदार निधीतून एलईडी टीव्ही संच आणि टॅब श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोंदेदुमाला यांना भेट देण्यात आला. टॅब व टीव्ही प्राचार्य तुषारराव पाटील यांनी स्वीकारले. खासदार नरेंद्र जाधव यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!