
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जातांना मोटारसायकलला कुत्रे आडवे गेल्याने अपघात झाला. यामध्ये मोटारसायकलवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी ११ च्या दरम्यान पाडळी देशमुख फाट्याजवळ हा अपघात झाला. MH 05 EH 4705 ह्या मोटारसायकलने नाशिककडे अनिल कैलास घोडेस्वार वय 32 पत्नी ज्योती अनिल घोडेस्वार वय 30 आणि मुलगी नम्रता अनिल घोडेस्वार वय 13 वर्ष सर्व रा. चाळीसगाव हे जात होते. पाडळी देशमुख फाट्यावर सकाळी ११ वाजता अचानक कुत्रे आडवे गेले. त्यामुळे झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांना वैद्यकीय मदत मिळाल्याने प्राण बचावला.