इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
शेनीतचे माजी सरपंच संदीप जाधव यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या सल्लागारपदी निवड झाली आहे. डुबेरे येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थापक व चेअरमन नारायण वाजे यांनी निवडीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. इगतपुरी तालुक्यातील सक्रिय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून संदीप जाधव ओळखले जातात. पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे, व्हॉइस चेअरमन अरुण वारुंगसे, जनसंपर्क संचालक शंकर वामने, राजु वैरागर, संचालक बबन वाजे, भिमाजी चव्हाण, काशिनाथ वाजे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. माजी सरपंच गणेश जाधव, माजी उपसरपंच राजु जाधव, शिवसेना शाखाप्रमुख सागर जाधव, हरिभाऊ गायकर, अंकुश जाधव, राजाराम जाधव, दत्ता जाधव, शांताराम जाधव, सुरज घनदास, निलेश जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.