शिवरायांचे अंगरक्षक संभाजी करवर यांच्या जयंतीची शासनदरबारी नोंद करावी : इगतपुरी तालुका कानडी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

संभाजी करवर ( जन्म १४ जानेवारी १६३६ ) या पराक्रमी शूरवीर योध्याची १४ जानेवारी रोजी जयंती व्हावी, याची राज्य शासनदरबारी नोंद करण्यात यावी. यासाठी इगतपुरी तालुका कानडी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन दिले.
निवेदनात नमुद आहे की, शिवरायांच्या १० अंगरक्षकांपैकी असलेले संभाजी करवीर यांचा जन्म १४ जानेवारी १९३६ रोजीचा असलेबाबत औंधचे संस्थान ( प्रांतप्रतिनिधी ) विजापुर येथील आदिलशाही दप्तरी तसेच निजामशाहीचे हैद्राबाद येथील दप्तरी आढळून आले आहे. त्यावेळी संभाजी करवर यांचे वास्तव्य कर्नाटकातील तंजावर येथे छत्रपती व्यंकोजी महाराज हुबळी, धारवाड आणि अहमदनगर, ठाणे, पालघर, नाशिक विभागातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले परिसरातील गड किल्ले विश्रामगड ( पट्टा किल्ला ), रतनगड, विक्रमगड, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नांदगाव तालुक्यातील मनमाड जवळील अंकाई- टंकाई किल्ला, इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ला, हरिहर गड, अलंग, मलंग, कुलंग किल्ले, पालघर विभागातील जव्हार, उस्मानाबाद विभागातील राघुची वाडी, तसेच सोलापूर विभागातील माळशिरस, जांबुड, करोले आदी ठिकाणी व परिसरात करवर घराण्याचे वास्तव्य आढळून येते तसेच जावळीची लढाई आटपाडी तालुक्यातील दिघची येथे आढळून येते. दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला स्वराज्याच्या कामी आलेल्या मावळ्यांच्या समाधीला नैवेद्य ठेवुन सण साजरा केला जातो. शासनाने याची दखल घेऊन शूरवीर संभाजी करवर यांची जयंतीची तारीख शासन दरबारी नोंद करुन साजरी करण्यात यावी. संभाजी करवर यांची जयंती साजरी करण्यात येण्यासाठी शासनाने याबाबत आदेश करावे अशी विनंती
इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदनात केली आहे. यावेळी इगतपुरी तालुका कानडी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने भरत हाळकुंडे, मदन बिन्नर, संजय ढोन्नर, सुभाष करवर, निवृत्ती करवर, लखन कोकाटे, गोकुळ बिन्नर, सचिन सदगीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!