दत्तात्रय मधुकर सहाणे यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या सल्लागारपदी निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

साकुर येथील माजी सरपंच दत्तात्रय मधुकर सहाणे यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. डुबेरे येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थापक व चेअरमन नारायण वाजे यांनी निवडीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. इगतपुरी तालुक्यातील सक्रिय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून दत्तात्रय सहाणे ओळखले जातात. पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे, व्हॉइस चेअरमन अरुण वारुंगसे, जनसंपर्क संचालक शंकर वामने, राजु वैरागर, संचालक बबन वाजे, भिमाजी चव्हाण, काशिनाथ वाजे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

साकुर परिसरातून अभ्यासू व्यक्तिमत्वाला सल्लागार म्हणून स्थान मिळाल्याने ह्याचा निश्चितच सर्वांना फायदा होईल असे सरपंच विनोद आवारी, उपसरपंच दिनकरराव सहाणे, तुकाराम सहाणे, संभाजी ब्रिगेडचे मनोज सहाणे यांनी सत्कारावेळी सांगितले. पोलीस पाटील शिवाजी सहाणे ईश्वर सहाणे, शाखा व्यवस्थापक सचिन वाजे, साहेबराव खातळे, मधुकर विठोबा सहाणे, जयराम सहाणे, प्रकाश सहाणे, दत्तू देवगिरे, सुभाष मुठाळ, रामदास सहाणे, सागर सहाणे, रमेश शिंगोटे, सुखदेव सहाणे, योगेश रंधे, योगेश गायकवाड, भाऊराव शिंदे, नारायण भोसले, अजय सहाणे, भाऊसाहेब सहाणे, जगनराव सहाणे, बाळू शेळके, सदानंद रंधे, अनिल उन्हवणे आदींनीही दत्तात्रय सहाणे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!