लोहशिंगवेजवळ पवन एक्स्प्रेसचे ११ डबे घसरले : घटनास्थळी बचाव कार्याला वेग

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

मुंबई दरभंगा पवन एक्स्प्रेसचे ११ डबे नाशिकच्या लहवितजवळ रुळावरून घसरले आहेत. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमाराला घडली. इगतपुरीहुन निघालेल्या ह्या गाडीचे डबे का घसरले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ह्या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची समजते. दुर्घटनेतील जखमींना नाशिकच्या जिल्हा  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. अनेक प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज असून मुले व महिला प्रवासी घाबरून गेले आहेत. बचाव कार्यासाठी रेल्वे पोलीस, आरोग्य पथक, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार दाखल झाले आहेत. अपघातानंतर दोन्ही मार्गावरील रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!